फलटण टुडे (बारामती ):
इंदापूर ॲम्युचर ज्युदो असोसिएशन व ड्रीम डान्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी बारामती, तालुका क्रीडा अधिकारी बारामती यांचे वतीने करण्यात आले.
पुणे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा बारामती क्रीडा संकुल येथे संपन्न होऊन यामध्ये ड्रीम डान्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी ने प्रथम क्रमांक मिळवला व अकॅडमी च्या विविध विद्यार्थ्यांनी विविध गटात वैयक्तिक पदकाची कमाई केली.
या प्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शिवाजी कोळी, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, पुणे जिल्हा पुणे जिल्हा असोसिएशन सचिव व आंतरराष्ट्रीय पंच अनिल संकपाळ, आयोजक दत्तात्रय व्यवहारे व सागर लाड,
सौ.जयश्री व्यवहारे, सौ.सोनल लाड, संभाजी भिडे,किरण बिरदवडे,ओम धुमाळ, सुहास तावरे, सागर जाधव, सागर बनसोडे,ओम जोशी, अमोल शहाणे, अविनाश पारेकर,रुपेश भालेराव,आदी मान्यवर उपस्तीत होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून सुधीर कोंडे, अतुल शेलार, वेल्सन डिसूजा यांनी काम पाहिले.
बारामती तालुक्यातील मुलांमध्ये १४ वर्ष वयोगटात अभिषेक भिसे, अमीर शेख, वंश गायकवाड, १७ वर्ष वयोगटात अथर्वराज बाबर, प्रणव तिडके, शंभूराजे फुलारी, विनोद गायकवाड १९ वर्ष वयोगटात अभिषेक भिलारे, यश शेलार, ऋतिक गिरमे, गौरव डमरे, कार्तिक कुताळ तसेच या स्पर्धेत सहभागी मुलींमध्ये १४ वर्ष वयोगटात स्नेहा थोरात, तनुष्का भुजबळ, वैष्णवी कुंभार, अस्मिता पिसाळ, सायली खोमणे १७ वर्ष वयोगटात तनिष्का कोळेकर, नक्षत्रा जगताप, श्रुती मोकाशी १९ वर्ष वयोगटात भावना रावत, समृद्धी जगताप, ज्ञानदा शिंदे, श्रुतिका कांबळे, ऋतुजा चौधरी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
या विजयी प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांची विभाग पातळीवर निवड झाली आहे.विविध मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तर
प्रशिक्षक सागर लाड यांनी उपस्तितांचे आभार मानले.