**
फलटण टुडे (बारामती):
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे 4.10.2023 ते 7.10.2023 अखेर शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण 52 शाळेतील 2863 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती विद्यालयाचे चित्रकला परीक्षा विभाग प्रमुख श्री रीमाजी मार्कड यांनी सांगितले. परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक श्री सुनील म्हस्के, सुजित जाधव, महेंद्र दीक्षित, भारत काळे, गाडेकर मॅडम, तावरे मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या परीक्षेसाठी राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल स्कूल बारामती, धो.आ.सातव माध्यमिक विद्यालय यांचे विद्यार्थी बैठक व्यवस्था यासाठी सहकार्य लाभले
परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख विद्यालयाचे प्राचार्य श्री गणपत तावरे, प्राचार्य पोपटराव मोरे, प्राचार्य गणपत गवळी,पर्यवेक्षक बाळकृष्ण सुतार यांनी मार्गदर्शन केले.