भारतीय तेल व बनवण्याची पद्धती आरोग्यासाठी उपयुक्त : राचेल पोलमन

घाना व तेल याची माहिती घेताना नेदरलँड युनिव्हर्सिटीचे सदस्य
फलटण टुडे (बारामती) :
भारतीय खाद्य संस्कृती मध्ये खाद्य तेलाचे स्थान आरोग्यासाठी महत्वाचे असून या मुळे पचन संस्था सुदृढ होतात प्रत्येक खाद्य तेल निसर्गाशी संबंधित आहे व उत्तम आरोग्य प्राप्त होते असे प्रतिपादन नेदरलँड युनिव्हर्सिटी येथील शिक्षण तज्ञ प्रो राचेल पोलमन यांनी केले . 
मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी नेदरलँड युनिव्हर्सिटी येथील शिक्षण तज्ञ यांनी बारामती रुई येथील त्रिवेणी ऑइल अँड फूड्स उद्योग समूहाला भेट देऊन
 ‘ भारतीय खाद्य तेल ‘ या विषयी माहिती घेतली.
या प्रसंगी नेदरलँड युनिव्हर्सिटी चे लेक्चरर बिजनेस इकॉनॉमिक्स बॅचलर बिजनेस अँड ऍग्री बिझनेस मास्टर चे प्रमुख पी. पेटरी व त्रिवेणी ऑइल च्या संचालिका शुभांगी चौधर व मार्केटिंग प्रमुख विनायक चौधर व उद्योजक वसंतराव चौधर व शारदानगर शैक्षणीक संकुल चे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्तीत होते.
तेल बियांचीची क्वालिटी व तेल निर्मिती प्रक्रिया , पॅकेजिंग व मार्केटिंग याची त्रिवेणी ऑईलच्या संचालिका शुभांगी चौधर यांनी सांगितली.
 तेलबिया ते निर्मिती प्रक्रिया याची . बॉटल पॅकिंग व मार्केटिंग , ब्रॅण्डिंग याबद्दल माहिती विनायक चौधर यांनी दिली. 
 नैसर्गिक खाद्य तेल सर्वाना मिळणे गरजेचे आहे व त्यापासून उत्तम आरोग्य सुद्धा मिळणे साठी त्रिवेणी उद्योग समूहांनी प्रचार व प्रसार करत असताना महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध केली असल्याने त्रिवेणी उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नेदरलँड चे सर्व मान्यवरांनी सांगितले.
आभार वसंतराव चौधर यांनी मानले 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!