*
वन्यजीव सप्ताह निमित्त मौजे पिंपळी येथे वनविभागाच्या वतीने मार्गदर्शन
फलटण टुडे (बारामती: प्रतिनिधी):
०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह निमित्त वन विभागाच्या वतीने तालुक्यातील पिंपळी येथे वनविभाग बारामती व रेस्क्यू टीम यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यप्राणी याविषयी लोकांच्या मनात असलेली भीती व बिबट्या व इतर प्राण्यां बाबत सखोल माहिती होणे साठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या प्रसंगी बारामती वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी उपस्तितांना मार्गदर्शन केले व उपस्टितांच्या शंकाचे निरसन केले.
या वेळी पिंपळी च्या सरपंच मंगल केसकर,छत्रपती कारखाना चे संचालक संतोष ढवाण,राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रमुख सुनील बनसोडे व अशोक ढवाण,सूर्यकांत पिसाळ, सोमनाथ यादव, कल्याण राजगुरू, उत्तमराव मदने, अंकुश केसकर आणि रेस्क्यू टीम चे बारामती व दौंड चे सदस्य नचिकेत अवधानी,श्रेयस कांबळे, डॉ श्रीकांत देशमुख, प्रशांत कौलकर, ऋषी मोरे व वन कर्मचारी प्रकाश लोंढे, उमेश केसकर व विद्यार्थी उपस्तीत होते.
वनविभागाच्या हद्दीत घुसखोरी करून वन्य प्राण्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे पण आपल्या शेतात किंवा घरात वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास स्वसंरक्षण व पशुधन वाचवण्यासाठी हल्ला परतवून लावणे हा गुन्हा होत नाही ,
बिबट्या त्याच्या सवयी ,रहिवास त्याच प्रमाणे तरस, कोल्हा, लांडगा आदी प्राण्याबाबत माहिती देऊन जर शेळी व मेंढी यांची शिकार वन्य प्राण्यांनी केली तर पंचनामा करून ३० दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर आर्थिक मदत शासनाकडून जमा होते त्या साठी आवश्यक कागतपत्रे आदी माहिती वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी दिली.
आभार बाळासाहेब बनसोडे यांनी मानले .