फलटण टुडे (फलटण दि.८ ) : –
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आणि सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा वाढदिवस आज सोमवार दि.९ ऑक्टोबर रोजी साधेपणाने साजरा होत आहे.
सकाळी ८ वाजता राजघराण्यातील साध्वी स्त्री श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज समाधी स्थळाचे दर्शन, मुधोजी मनमोहन राजवाड्यातील परंपरागत देवघरातील देव देवतांचे दर्शन, श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामाचे दर्शन, श्री नागेश्वर दर्शन घेणार आहेत.
सकाळी ८.३० वाजता सरोज व्हीला, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी दुपारी १ वाजेपर्यंत फलटण शहर व तालुक्यासह सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून व अन्य ठिकाणाहुन आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या सरोज व्हीला, फलटण येथील अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खालील युट्यूब चॅनलवर सोमवार दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत पाहता येईल.
https://youtube.com/@prashantranawarelive?si=sx3MrhT_Mcy9Axc6