फलटण टुडे (बारामती: ):
सध्याच्या अत्याधुनिक काळात समोरच्या कडून प्रत्येकाच्या अपेक्षा जास्त आहेत व कमी श्रमात जास्त पैसा पाहिजे जर कमी पैसा किंवा कमी वाटणी मिळाल्यास नवीन वादास सख्या भावात व भावकित सुरुवात होते अन्याय झालेला न्याय मागण्यासाठी कधी, नातेवाईक तर कधी कोर्टात जातो तर कधी रक्तपात होतो परंतु जरी अन्याय झाला तरी त्यास काही मंडळी सहन करतात व आध्यात्मिक मार्गातून आनंद साधतात .
इंदापूर तालुक्यातील डाळज येथील शिंदे कुटूंबात सदर घटना घडली
घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच वडील असे पर्यंत , एकत्र राहणारे मोठे कुटुंब व प्रतिष्ठित कुटूंब होते वडीलांच्या निधनानंतर हळू हळू जमीन वाटणी साठी सुरुवात होऊ लावली
अशा वेळेस ज्या व्यक्तीने जमीन घेण्यासाठी जास्त कष्ट व धन खर्च केला त्याच व्यक्ती समान वाटणीतील सर्वात कमी हिस्सा जाणीवपूर्वक देण्यात आला.
मिळालेल्या वाटणीतील शेतीकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, तसेच राहण्यासाठी घरामध्ये हिस्सा देण्यात आला नाही अशा वेळी एखादी व्यक्ती रागास जाईल ,भांडणे करील, कोर्ट कचेऱ्या करेल ,मानसिक खचून जाईल परंतु भगवंताचा आशीर्वाद समजून मिळाले त्यात सुख समजून शांत राहिली कोणतेही चुकीचे पाऊल न टाकता
देव दर्शन व तिर्थस्थान भेट करते व भागवत ग्रंथ खरेदी करून
गणेश आगमन दिवशी भागवत ग्रंथाचे वाचन सुरू करून , १० दिवसात १३१२ पाने, १८००० श्लोक, ३४० अध्याय पूर्ण वाचन करून
रीतसर पूजन करून अध्याय समाप्ती करते .
जगा व जगू द्या या उक्ती प्रमाणे शांत राहून आपली दिनक्रम सुरू करून पुन्हा पडीक शेता चे पूजन करून नवीन कामाचा शुभारंभ करते
नवीन पिढीस संदेश देतात “नशीबातील कोणी नेहणार नाही निसर्गावर विश्वास ठेवा कोणत्याही क्षेत्रात योग्य वेळी न्याय मिळणारच ”