**
कु.साहिल शिंदे
फलटण टुडे (कोरेगांव ) :-
सातारा जिल्हा अँमँच्युअर अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने डी. बी. भोसले महाविद्यालय, कोरेगांव ता. कोरेगांव येथे दि. ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या सातारा जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर काँलेज, , फलटणच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत यश संपादन केले. या मधे कु.साहिल शिंदे याने १६ वर्षे वयोगटातील २००० मी. मी.धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून डेरवण जि. रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे . तसेच ८०० मी धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. आणि कु. प्रणव निंबाळकर १६ वर्षे वयोगटात ८० मी. हर्डल्स धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.
या खेळाडूंना क्रीडा प्रा.टी.एम. शेंडगे व प्रा. डी. एल. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळांडूचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सातारा जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन रघूनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ. ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष व ग.कौ. सदस्य शिवाजीराव घोरपडे, फ.ए.सो, चे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा मुधोजी हायस्कुल व ज्यु.काँलेजचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, क्रीडा समिती सचिव सचिन धुमाळ, सदस्य महादेवराव माने क्रीडा समितीचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.