फलटण टुडे (कोरेगांव ) :
डी.पी. भोसले महाविद्यालय, कोरेगांव येथे झालेल्या सातारा जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत मुधोजी महाविद्यालय , फलटण कनिष्ठ विभागाच्या खेळाडूंनी यश मिळविले. कु. संस्कार गजानन पिंगळे – ( एन.सी.सी कँडेट ) 3000 मी. धावणे सुवर्ण पदक व नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.कु. विठ्ठल बापूराव दडस -( एन.सी.सी कँडेट ) 3000 मी. स्टीपलचेस धावणे -सुवर्ण पदक -नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.कु.सार्थक दत्ताञय भोईटे -( एन.सी.सी कँडेट )200 मी.धावणे तृतीय क्रमांक कु.ओमकार गजानन पिंगळे ( एन.सी.सी कँडेट )800 मी. धावणे – तृतीय क्रमांक
या सर्व यशस्वी खेळाडूंचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जि. प. माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा , मा.प्राचार्य , मा. उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचेअभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.