मुलगी वाचवा,पर्यावरण वाचवा अभियान राबवत महिलांचा सहभाग
फलटण टुडे(बारामती )
स्त्री भ्रूण हत्या करू नका, मुलगी शिकवा व पर्यावरण वाढवा,प्लॅस्टिक चा वापर नको,चांद्रयांन मोहीम आदी सामाजिक विषयावर उखाणे आणि सामान्य ज्ञान वर आधारित व विविध मनोरंजन खेळावर आधारित अनिल सावळेपाटील प्रस्तुत “होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनीं ” चा कार्यक्रमात परिसरातील महिलांनी भाग घेऊन विविध बक्षिसे जिंकली .
शिरषणे येथील आदर्श तरुण मंडळ यांनी गणेशोत्सव निमित्त महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळावे या उदेश्याने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सरपंच मोनिका तुषार खुटवड व चंदूकाका सराफ अँड सन्स चे धनंजय माने,विनोद जगताप,सचिन जाधव ,रणजित सावळे, प्रवीण काळे व विविध संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्तीत होते.
या मध्ये प्रथम विजेत्या अनिता अशोक काळंगे,
द्वितीय ऋनिता अतुल चव्हाण,
तृतीय शितल कृष्णात पवार
यांना पैठणी व इतर बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झाल्याबद्दल संदीप रविराज खलाटे व विशाल दत्तात्रय लोखंडे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चा
सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरीकरण अनिल सावळेपाटील यांनी केले स्वागत अतुल चव्हाण व हेमंत पवार यांनी केले तर आभार विजय साळुंखे यांनी मानले .