राष्ट्रवादी (अजित पवार गट ) सातारा जिल्हाध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे

श्रीमंत संजीवराजे यांना नियुक्तीपत्र देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शेजारी सुनील तटकरे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर.


फलटण टुडे ( फलटण ) :-
सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीमंत संजीवराजे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला .

यावेळी माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे यांनी आतापर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष, फलटण पंचायत समितीचे सभापती आणि इतर अनेक पदांवर काम करून, आपला ठसा उमटवला आहे.जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या श्रीमंत संजीवराजे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व मान्यवरांनी अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!