श्री दत्त सोसायटीस जिल्हा बँकेचा पुरस्कार

 

बारामती: 
 मळद (ता.बारामती) येथील श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‘तालुक्यातील उत्कृष्ट सोसायटी ‘ म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व मानाची ढाल देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, आदी मान्यवर यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी सोसायटी चे चेअरमन बाळासाहेब उर्फ दत्तात्रय गवारे, सचिव नवनाथ बारवकर संचालक दीपक पवार, दत्तात्रय सातव, तुकाराम गावडे, पोपटराव ढवाण,राजेंद्र गायकवाड, प्रमोद सातव,प्रदीप मुश्रीफ, हेमंत क्षीरसागर, धीरज पोतेकर, नागेश लोंढे, नीता जाधव, रेखा हरनोळ, विशाल गायकवाड, मानसिंग गवारे, शैलेश साळुंके, रमेश रणदिवे आदी संचालक उपस्तीत होते.
सोसायटी चे सभासद, खेळते भाग भांडवल,सण २०२२ व २०२३ आर्थिक वर्षातील कर्जाची १००% वसुली व लाभांश वाटप या आधारावर तालुक्यातील सोसायटी मध्ये सर्वात उत्तम व उत्कृष्ट कामगिरी असल्याने सदर पुरस्कार श्री दत्त सोसायटीस मिळाल्याचे चेअरमन बाळासाहेब गवारे व सचिव नवनाथ बारवकर यांनी सांगितले.
—————————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!