बारामती:
दि २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान ३ महाराष्ट्र आर्मड राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅम्प पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या मध्ये बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल, सावळ मधील एकूण 21 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ज्ञानसागर च्या सायली शिंगटे,संस्कृती कुटे, तनुजा घोरपडे, श्रावणी बनसोडे, जान्हवी गुळवे, अश्विनी आटोळे, प्रांजली पवार,स्मिता आवाळे,सानिका खारतोडे,अनुष्का बंडगर, वैष्णवी शिंदे, श्रवण गोफणे, आर्यन वरे, अथर्व खताळ, ओम बंडगर, राज भंडगे, कार्तिक निंबाळकर, दिक्षांत शेलार, यश निगडे, स्वयम कुंभार, प्रणय वाघमारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या कॅम्पमध्ये रायफल शुटींग, परेड, झेंडावंदन, स्वच्छता अभियान , ड्रील मार्च व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातुन शिस्त, वेळेचे महत्व, कष्ट, जबाबदारी, लिडरशिप अशा कित्येक गुणांचा विकास यामधून होणार आहे.तसेच एन सी सी चे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये प्राधान्य दिले जाते.
क्रिडा शिक्षक मेजर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे व मानसिंग आटोळे, रेश्मा गावडे यांनी अभिनंदन केले आहे .