बारामती: बारामती शहरातील विजय नगर युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मार्फत ‘चांद्रयान मोहीम ‘ चा देखावा हलता सादर करण्यात आला आहे सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे विशेषतः शाळकरी मुलांची गर्दी होत आहे .
अध्यक्ष- शुभम कोठारी,उपाध्यक्ष भावेश धनवानी,खजिनदार हेमंल शहा
सचिव शुभम बंडगर,कार्याध्यक्ष उल्हास कोरे व सर्व सदस्यांनी सदर हलता देखावा तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
भारतासाठी म्हतपूर्ण व अभिमानस्पद बाब असल्याने सदर हलता देखावा केला आहे यान सुरू झाल्यापासून चंद्रावर पोहचते व रोव्हर चे कार्य सुरू होते असे दाखविण्यात आल्याने सदर देखावा जिवंत वाटतो त्यामुळे नागरिक पाहण्यासाठी गर्दी करीत आहे त्याच प्रमाणे चांद्रयान मोहिमेतील प्रत्येक प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे दिली जात असल्याने शाळकरी मुले सुद्धा पहावयास गर्दी करीत आहे