फलटण टुडे (बारामती ):
-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, आयोजित शालेय तालुकास्तर व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी संपन्न झाली.स्पर्धेमध्ये १४/१७/१९ मुले/ मुली असे एकूण ७२ शाळाच्या संघानी सहभाग नोंदवला.
,स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी. महेश चावले, प्रा.लक्ष्मण मेटकरी, प्रा.अशोक देवकर, प्रा.किरण पवार.संजय लोंढे , धनंजय यादव ,व्हॉलीबॉल प्रशिक्षक अक्षय तावरे ,प्रो कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड ,मोहन कचरे , दत्तात्रय चव्हाण , महेश रणवरे , अभिजित दरेकर कराटे असोसिएशनचे रविंद्र कराळे ,अभिमन्यू इंगुले उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे- १४ वर्षे मुले – नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे,
१७ वर्षे मुले – चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बारामती,
१९ वर्षे मुले -शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.
१४ वर्षे मुली- म.ए.सो.ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती,
१७ वर्षे मुली- म.ए.सो.ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती,
१९ वर्षे वयोगट मुली – विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती,
वरील सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी बारामती तालुक्याचे प्रतिनिधी करतील.विजेत्या संघास सौ. शितलताई वैभव मोरे,सरपंच मूर्टी-मोढवे,यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आल्या. राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक शिवाजी जाधव यांनी स्पर्धेचे संयोजन केले.