रुई मध्ये कुस्ती क्षेत्रातील नामवंता चा सन्मान
फलटण टुडे (बारामती ):
झटपट व दिखाऊ यश कुस्ती मध्ये नसते तर झोकून देऊन सराव करणे आणि आवडत्या गोष्टीचा त्याग व व्यायाम यांची गोळा बेरीज म्हणजे कुस्ती होय असे प्रतिपादन तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते व पुणे शहर अप्पर पोलीस अधीक्षक (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) पै. विजय चौधरी यांनी केले.
रविवार १७ सप्टेंबर रोजी रुई येथे
पै. अनिकेत जनार्दन चौधर व रुई ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवान यांनी विविध कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ चे आयोजन केले होते या वेळी पै.विजय चौधरी बोलत होते.
या प्रसंगी,बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, जनार्दन चौधर,रोहिणी चौधर व रुई मधील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्तीत होते.
उत्तम व्यायाम, उकृष्ट आहार, इतर बाह्य गोष्टीं पासून दूर राहून फक्त ध्येयायकडे लक्ष द्या व आई वडिलांचे आशीर्वाद , तरच प्रत्येक तरुणांमधील पैलवान सहज घडेल व कुस्ती मध्ये यश मिळेल असा सल्ला सांगून विविध कुस्ती स्पर्धे मधील अनुभव कथन केले आणि रुस्तमे ए हिंद ची गदा जिंकनार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मुळशी केसरी विजेता पै.पंकज हरपुडे, पै.अक्षय शिंदे, पै.विक्रम पारखे, पै.भारत मदने, यांचा सन्मान करण्यात आला .
बारामती परिसरातील पालक व तरुणांना नामवंत पैलवाण यांचे अनुभव ऐकता यावे, कुस्ती क्षेत्रा ची सर्व माहिती मिळावी, यातील बारकावे माहीत होणे साठी सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे पै.अनिकेत चौधर यांनी सांगितले.
विजय चौधरी यांच्या हस्ते महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या माध्यमातून कर सल्लागार पदी नियुक्ति झालेबद्दल स्वप्नील चौधर,राष्ट्रवादी सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा अजिनाथ चौधर आदी चा सन्मान करण्यात आला.
सर्व सामान्य परिस्थिती मध्ये सुद्धा पैलवान घडू शकतात त्यासाठी आई वडील यांची म्हतपूर्ण भूमिका असून त्यांच्या कष्टाचे झीज प्रत्येक पैलवान यांनी करावे असे जनार्दन चौधर यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.आभार पै. अनिकेत चौधर यांनी मानले.