फलटण टुडे (बारामती ) :
पावसाचे पाणी इतरत्र वाहून न जाता जाग्यावर साठवून राहावे व जमिनीची धूप चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून महाराष्ट्र शासन वन विभागाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम जराडवाडी येथे बऱ्हाणपूर येथील बारामती कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने करण्यात करण्यात आले.
या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत गोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वन कर्मचारी दिलीप काळे, शुभम जराड, मच्छिंद्र जराड व कॉलेज चे विद्यार्थी व अधिकारी व उंडवडी ग्रामपंचायत चे पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसरात ५ बंधारे बांधून पूर्ण केले त्याचा फायदा परिसरातील शेतीला होणार आहे.