फलटण टुडे (गोखळी प्रतिनिधी) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील जगन्नाथ दादा गेजगे यांचे चिरंजीव हनुमान माध्यमिक विद्यालयातील.माजी विद्यार्थी पै .मंथन गेजगे यांची पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ८० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली, तसेच सातारा जिल्ह्यातून पै .गायकवाड याने व्दितीय क्रमांक क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी विद्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, हणमंत जगताप, वस्ताद दादा गेजगे, विद्यालयाचे प्राचार्य हरीभाऊ अभंग, सुनील सस्ते सर,मोहन ननावरे, प्राध्यापक पवार सर,किरण पवार सर, शुभांगी भोसले- बोंद्रे मॅडम, राजेंद्र भागवत,शरद निकाळजे.आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*पै.मंथन गेजगे ची विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल हनुमान विद्यालयामध्ये सत्कार*
पै . मंथन गेजगेचा सत्कार करताना मनोज गावडे व इतर मान्यवर