फलटण टुडे (फलटण):
फलटण येथील छत्रपती शिवाजी वाचनालयास, “वंदे मातरम संघटना “, पुणे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी “पुस्तक दहीहंडी” कार्यक्रम आयोजित करणेत येतो. या अनुशंघाने यंदाच्या पुस्तक दहीहंडी या कार्यक्रमात फलटण येथील छत्रपती शिवाजी वाचनालय या संस्थेस 150 वर्षे पूर्ण झाले म्हणून फलटण येथील रहिवासी व सध्या पुणे स्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश उर्फ गिल्लू देशपांडे यांनी 130 नामांकित पुस्तकांचा संच देणगी स्वरूपात दिला त्याबद्दल फलटणच्या छत्रपती शिवाजी वाचनालय संस्थेच्या संचालक मंडळा कडून त्यांचे कौतुक करण्यात आले व आभार मानण्यात आले .
यावेळी छत्रपती शिवाजी वाचनालयाचे प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे ,फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर ,युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर , हरिश्वर गजफोडे ,ओंकार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.