लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने गुणवंताचा सन्मान
फलटण टुडे (बारामती )
चित्रपटातील हिरो हे दिखाऊ असतात परंतु कठीण परिस्थितीत टिकाऊ पणा दाखवून मुलांना यश मिळवून देण्यासाठी प्रत्यनाची पराकाष्टा करणारे आई वडील हेच प्रत्येकाच्या जीवनातील रियल हिरो असल्याचे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी केले.
लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने नीट, जेईई,सीईटी,एनडीए व इतर परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रसंगी हंकारे बोलत होते.
या प्रसंगी लडकत सायन्स अकॅडमी चे संचालक प्रा नामदेव लडकत, प्रा गणेश लडकत, दत्तात्रय लडकत व जलसंपदा विभागाचे अभियंता चंद्रशेखर लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ,राज भरणे ,ऍड अनिल फडतरे आदी मान्यवर उपस्तीत होते.
आई वडिलांचे कष्ट समजून घ्या,मान खाली घालण्यास भाग पाडू नका, मोबाईल कामा पुरता वापरा असा सल्लाही वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सर्व अत्यावश्यक शैक्षणिक सुविधा देत, गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण देत विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील यश प्रत्यनाच्या व अचूक मार्गदर्शना च्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी लडकत सायन्स अकॅडमी कटिबद्ध असल्याचे प्रा नामदेव लडकत यांनी सांगितले.
अनुभवी प्राध्यापक वर्ग, सर्व अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य व अभ्यास करवून घेण्याच्या पद्धती या मुळे अवघड वाटणारा अभ्यास सहज व सोपा वाटतो त्यामुळे स्पर्धात्मक युगात सुद्धा सहज लक्ष्य गाठता आल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले.
विद्यार्थी व पालक यांचा आत्मविश्वास तर लडकत सायन्स अकॅडमी चे अचूक मार्गदर्शन यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रा गणेश लडकत यांनी सांगितले.
या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
अनिल सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले प्रफुल्ल आखाडे यांनी आभार मानले.