**
फलटण टुडे (बारामती ) :
बारामती शहरातील रुई येथील प्रा अजिनाथ चौधर यांची राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
सदर निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले शनिवार ०९ सप्टेंबर रोजी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,महिला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर, बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील ,बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव
यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्तीत होते.
प्रा अजिनाथ चौधर यांनी शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर बारामती रुई परिसरात मतदार नोंदणी अभियान, वृषरोपण ,रक्तदान शिबिर, युवकाचे संघटन, सार्वजनिक वाचनालय,स्वछता मोहीम, छत्री वाटप, महिलां साठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार व शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी निवडीनंतर सांगितले