फलटण टुडे (बारामती ):
जळोची येथील प्रताप गुलाबराव पागळे यांची राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले शनिवार ०९ सप्टेंबर रोजी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,महिला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्तीत होते.
बारामती तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष व इतर सामाजिक संस्थांवर प्रताप पागळे यांनी काम केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार व शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे प्रताप पागळे यांनी निवडीनंतर सांगितले