फलटण टुडे(बारामती ) : –
बारामती एमआयडीसी येथील वंजारवाडी युथ फेस्टिवल चा धनंजय भाऊ मुंडे दहीहंडी चषक दहीहंडी महोत्सव ची मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दि.०8सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता.
या उत्सवाचे आयोजन पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार बारामती यांच्या माध्यमातून करण्यात आले. या दहीहंडी महोत्सवाचे उदघाटन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव फड यांच्या हस्ते संपन्न झाले.
“पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोपालांच्या धाडसाला हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून व दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जाते ही कौतुकास्पद बाब असल्याचे ”
परळी य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव फड यांनी सांगितले
या प्रसंगी अभिनेत्री मनीषा बोरकर व इतर इतर नृत्यांगना यांनी दहीहंडी च्या हिंदी मराठी गाण्यावर नृत्य केले.
दहीहंडी विजेत्या संघाला वंजारवाडी युथ फेस्टिवल च्या वतीने आयोजक पोपट भाऊ दराडे व जितेद्र विरकर
सागर भाऊ दराडे , नितीन भाऊ चौधर अजित चौधर राहूल दादा शिरसठ यांनी आ. धनंजय भाऊ मुंडे चषक देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान चौकामधील दहीहंडी पथकांचा थरार पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वंजारवाडी युथ फेस्टिवल चे पोपट भाऊ दराडे, शरद चौधर, राहुल शिरसट , सचिन चौधर, समीर चौधर , विशाल चौधर , आकाश सूर्यवंशी, अजित भोसले, रोहित साळुंके, विजय चौधर, शुभम दराडे, प्रवीण चौधर, तारा देवासी आदी मान्यवर उपस्तीत होते. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सागर दराडे यांनी मानले