शुद्ध व नैसर्गिक खाद्यतेल बनविण्याच्या पद्धती जाणून घेतल्या
फलटण टुडे (बारामती: प्रतिनिधी ) :
बनावट व भेसळ युक्त खाद्य तेलामुळे हृदय विकार ,कॅन्सर ,व इतर आजार होत असताना शेतकऱ्यांनी खाद्य तेल च्या संदर्भात तेलबिया चे उत्पन्न वाढवावे व तेल उत्पन्न करणारे घाणे यांची संख्या वाढवावी या उदेश्याने राज्याच्या कृषी विभागातील कृषी अधिकारी यांचा अभ्यास दौरा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजने अंतर्गत बारामती रुई येथील त्रिवेणी ऑईल मिल अँड फूड्स या ठिकाणी संपन्न झाला.
या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, प्रकल्प समनव्यक जीवन बुंदे, पणन विश्लेषक डॉ अभय गायकवाड ,त्रिवेणी ऑईल मिल व फूड्स च्या चेअरमन शुभांगी चौधर, उद्योजक वसंतराव चौधर, विनायक चौधर व बारामती फौंडेशन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी जया तिवारी आणि राज्यातील कृषी अधिकारी उपस्तीत होते.
शेंगदाणा, सूर्यफूल, जवस, तीळ, मोहरी आदी पासून खाद्य तेल घाण्याच्या माध्यमातून बनविणे व विक्री व्यवस्थापन करणे ग्राहकांना शुद्ध तेल देत असताना समस्या व त्यावरील उपाय या संदर्भात शुभांगी चौधर यांनी माहिती दिली.
वाढती लोकसंख्या व तेल बियाचे उत्पन्न कमी, घाणा परंपरा लोप पावत असताना परदेशातून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करावे लागते त्याचप्रमाणे भेसळ रोखणे आव्हान असल्याने शासन तेल बिया उत्पन्न व घाणा व्यवसायास चालना देण्याचा विचार करत असल्याचे प्रकल्प समनव्यक जीवन बुंदे यांनी सांगितले.
स्वागत विनायक चौधर यांनी केले वसंतराव चौधर यांनी आभार मानले