तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलचा दबदबा

मुधोजीचे 14 व 17वर्षाखालील क्रिकेट संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र तर 19 वर्षाखाली संघ उपविजेता

फोटो 1 व 2 -14 व 17 वर्षाखालील क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य ए वाय ननवरे , पर्यवेक्षक वसंतराव शिंदे , गोपाळ जाधव , सुनिता माळवदे , सचिन धुमाळ , अमोल नाळे , सुजीत जमदाडे , प्रितम लोंढे व इतर मान्यवर

फलटण टुडे (ठाकूरकी ) : –
फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा अभियांत्रिकी महाविद्यालय ठाकूरकी ता. फलटण येथे दिनांक 06 व 07 सप्टेंबर 2023 रोजी पार पडल्या यामध्ये 14 वर्षांखालील , 17 वर्षांखालील व 19 वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये 14 , 17 व 19 वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण ,श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) जाधववाडी व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल ( एस एस सी ) जाधववाडी जि. प . हायस्कुल कुरवली खूर्द, हणमंतराव पवार हायस्कूल फलटण , शिंदेवाडी हायस्कूल आनंदनगर, सरदार वल्लभभाई हायस्कूल (मूली ) या संघांनी आपला सहभाग नोंदविला होता .


या स्पर्धेचे उद्घाटन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र नार्वे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी तालुका क्रीडा ऑफिसचे मुकुंद गायकवाड ,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ ,
फलटण तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे , मनोज कदम , डी एन जाधव , अमोल नाळे , सुजीत जमदाडे , प्रितम लोंढे , संदिप ढेंबरे , अमित काळे , कुमार पवार , सुहास कदम ,सोमनाथ चौधरी , पंच अविनाश अहिवळे , सागर भंडलकर , रवि दळवी हे उपस्थित होते .

14 वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये मुधोजी हायस्कूल संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) यांच्यात झाला मुधोजी हायस्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले यावेळी श्रीमंत शिवाजीराजे संघाने 6 षटकात 6 गाड्यांच्या मोबदल्यात 50 धावा केल्या याच्या प्रत्युत्तरादाखल मुधोजी हायस्कूल संघाने श्रीमंत शिवाजीराजे ( सीबीएसई) संघाचा 9 गडी राखून पराभव केला या सामन्यत मुधोजी हायस्कूल संघातर्फे शंभूरज टेंबरे याने 20 चेंडूत 28 धावा केल्या तर समर्थ निंबाळकर याने 12 धावा देत 3 विकेट घेतल्या व विजयात सिंहाचा वाटा उचलला

17 वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एसएससी ) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले प्रथम फलंदाजी करताना मुधोजी हायस्कूल संघाने 6 षटकांमध्ये 1गड्याच्या मोबदल्यात 64 धावा केल्या प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीमंत शिवाजीराजे (एस एस सी )संघाला 6 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावाच करता आल्या व हा सामना मुधोजी हायस्कूल ने 36 धावांनी एकतर्फी जिंकला या सामन्यामध्ये मुधोजी हायस्कूलच्या सोहम सुळ याने 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले तर अबसार मेटकरी याने 8 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद करत या विजयात सिंहाचा वाटा उचलला

19 वर्षाखालील झालेल्या अतीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून मालोजीराजे शेती विद्यालय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाने 5 षटकात 3 गडांच्या मोबदल्यात 40 धावा केल्या प्रत्युत्तरादाखल खेळताना मालोजीराजे शेती विद्यालयाने 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडू वरती 4 धावांची गरज असताना विजयी चौकार मारून या धावांचा यशस्वी पाठलाग केला .यावेळी मालोजीराजे शेती विद्यालय संघातर्फे हर्षवर्धन कदम याने 15 धावात 2 गडी बाद करून 14 धावा काढल्या त्याला आदित्य गायकवाड याने तुफानी खेळी करत 25 धावा करत शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना त्याने विजयी चौकार मारत मालोजीराजे संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला व मालोजीराजे संघ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला तर मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हा संघ उपविजेता ठरला .

या विजया बद्दल विधान परिषदेचे विद्यमान आमदार तथा विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा . अध्यक्ष तथा महाराष्ट्र अॅम्युचअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,अधीक्षक श्रीकांत फडतरे , शाळा तपासणीस दिलीप राजगुडा व फलटण एज्युकेशन नियमक मंडळाचे सर्व सदस्य प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , ज्युनिअर विभाग उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख , माध्यामिक उपप्राचार्य ए वाय ननावरे , पर्यवेक्षक वसंतराव शिंदे, गोपाळराव जाधव , सौ सुनिता माळवदे , क्रीडा सचिव सचिन धुमाळ , क्रीडा शिक्षिका धनश्री क्षिरसागर आणि विद्यालयाचे शिक्षक वृंद यांनी 14 व 17 वर्षाखालील क्रिकेट संघाचे व क्रीडा प्रशिक्षक अमोल नाळे व सुजीत जमदाडे , प्रितम लोंढे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!