फलटण टुडे (बारामती):
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटननेचे पडसाद राज्यभर दिसून येत आहेत.याच घटनेच्या निषेधार्त आज बारामती युवक काँग्रेस तर्फे बारामती मध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला.शांतता आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप आंदोलकांवर शिंदे फडणवीस सरकारने अमानुष लाठीमार केला ,स्त्रिया ,वृद्ध,लहान मुलांना मारहाण झाली.अहिंसक मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या लोकांवर लाठीमार करणारे हे जनरल डायर सरकार असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी या प्रसंगी करण्यात आली.गृहमंत्री हे सामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी असतात पण तेच आज सामान्य लोकांच्या जीवावर उठले आहेत.वारकऱ्यांवर लाठीमार,अग्निशामक दलाच्या भरती साठी आलेल्या मुलांवर लाठीमार ,आरक्षणासाठी शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.या मशाल मोर्चा प्रसंगी बारामती शहर अध्यक्ष अशोक इंगुले, ॲड इन्कलाब शेख युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले,महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस वीरधावल गाडे, ॲड.आकाश मोरे,डॉ विजय भिसे,विपुल तावरे ,सौरभ रूपनवर रमेश इंगुले ॲड तुषार ओव्हाळ ॲड रिजवान शेख ॲड बिलाल बागवान भारत रामचंद्रे बाळासाहेब देवकाते राजेश शिंदे कुंदन साळवी सिद्धेश गवळी सुशांत सोनवणे संकेत सोनवणे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते.