फलटण टुडे (बारामतीप्रतिनिधी ):
सावळ ता.बारामती येथील कु. किरण बाळासो खोमणे हिची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत झालेल्या कृषि सेवा परीक्षेत कृषि उपसंचालक वर्ग 1 पदी निवड झाली आहे.
कु. किरण खोमणे हिचे प्राथमिक शिक्षण हे जि.प. प्राथमिक शाळा वांजरवाडी येथून तर माध्यमिक शिक्षण श्री नागेश्वर विद्यालय, शेटफळगडे येथे झाले.११ वी १२ वीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथुन झाले.
उच्च शिक्षण शरदचंद्र पवार कृषी महाविद्याय बारामती येथे झाले. पदवीत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर येथे कृषि किटक शास्त्र विषयात झाले.
लहान वयातच वर्ग १ चा अधिकारी बनायचे हे ध्येय उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरूवातीस अभ्यास करताना आई वडिलांची स्वप्ने डोळ्यासमोर येत होती. आई वडीलांनी आम्हा पाच बहिण भावास मोठ्या कष्टाने शिकवले. यशस्वी भव: चा मंत्र कायम आमच्या मनात रुजवला होता. वडिल कायमचे म्हणायचे की बाळ तुझ्या निवडीचे पोस्टर्स चौकाचौकात लागावेत, तु लाल दिव्याच्या गाडीतुन यावेस हे वडिलांचे स्वप्न काही दिवसातच पुर्ण झाले.