महावितरण पणदरे एमआयडीसी साठी नवीन उपकेंद्र उभारणार: सुनील पावडे

सुनील पावडे यांना निवेदन देताना एमआयडीसी मधील उद्योजक


फलटण टुडे ( बारामती ):
पणदरे लघु औद्योगिक क्षेत्रात नवीन लघुउद्योगांची संख्या दिवसोंदिवस वाढत असून सद्यस्थितीतील लघुउद्योजकांकडून सदोष विद्युत पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून महावितरण पणदरे परिसरात लवकरच एक नवीन उपकेंद्र उभारणार असून त्यातून पणदरे औद्योगिक क्षेत्राला स्वतंत्र वाहिनीने विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे काही दिवसातच येथील उद्योगांना योग्य दाबाने अखंड विद्युत पुरवठा होणार असून उद्योगांच्या तक्रारी शून्य संख्येवर आणली जाईल अशी ग्वाही महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली. 
असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
या प्रसंगी 
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे (बिमा) अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख वकील, हरिभाऊ थोपटे, उद्योजक चंद्रकांत नलवडे, संजय पवार, संदीप जगताप, हरिश्चंद्र खाडे, उज्ज्वल शहा, किरण जगताप, निलेश जगदाळे, किशोर खरात, नितीन जगताप, विजय कदम, संतोष वाघ, शहाजी साबळे, शिवाजी साळुंखे, शिवराज जामदार, धनंजय शिंदे, संतोष बोबडे आदी उद्योजकांसह महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, उपकार्यकारी अभियंता मोहन सुळ. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मदन साळवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांचे विद्युत पुरवठ्यासंबंधी अनेक समस्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. व्होल्टेज चढउतार व वारंवार ट्रिपिंग द्वारे खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे लघुउद्योगांच्या किमती यंत्रसामुग्री व कच्च्या मालाचे अतोनात नुकसान होऊन वारंवार आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अखंडित विद्युत पुरवठा होण्यासाठी पणदरे एमआयडीसीला एक्सप्रेस फीडर द्वारे विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी केली.  

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!