मुधोजी च्या कुस्तीपटुंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या सोबत प्राचार्य बाबासाहेब गंगावणे व इतर मान्यवर
फलटण टुडे( वाठार निंबाळकर ) :-
फलटण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 31ऑगस्ट व 1सप्टेंबर रोजी शौर्य अकॅडमी गोळेगाव (पुनर्वसन ) ता फलटण येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली .
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी
14 वर्षाखालील मुले 38 किलो वजनी गटात साई तांबे याने प्रथम क्रमांक मिळवीला तर 41 किलो वजनी गटात राजवीर भोसले याने प्रथम क्रमांक मिळवीला तर 57 किलो वजनी गटात ज्ञानराज पिसाळ याने प्रथम क्रमांक, 52 किलो वजनी गटात समर्थ शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला
तर 17 वर्षाखालील मुले 55 किलो वजनी गटात शिवतेज शिनगारे प्रथम क्रमांक व 19 वर्षाखालील मुले 61 किलो वजनी गटात निलेश जाधव प्रथम क्रमांक तर 14 वर्षे मुली 36 किलो गटात श्रेया धायगुडे प्रथम क्रमांक 17 वर्षाखालील मुली 65 किलो गटात श्रुती चव्हाण प्रथम क्रमांक 19 वर्षाखालील मुली 50 किलो गटात राजनंदिनी रणवरे प्रथम क्रमांक मिळविला
या सर्व यशस्वी खेळाडू चे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,अधीक्षक श्रीकांत फडतरे , शाळा तपासणीस दिलीप राजगुडा व फलटण एज्युकेशन गव्हर गव्हर्निंग कौन्सिल चे सर्व सदस्य प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपमुख्याध्यापक ए वाय ननावरे , पर्यवेक्षक व्ही जी शिंदे, जी ए जाधव , सौ मनिषा बगाडे आणि क्रीडा सचिव सचिन धुमाळ , क्रीडा शिक्षीका धनश्री क्षिरसागर व शिक्षक वृंद यांनी कुस्तीपटूं चे व प्रशिक्षक क्रीडा शिक्षक जाधव डी एन या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .