फलटण टुडे ( सांगवी / फलटण ) :
“युवकांना ध्येयाची जाणिव करुन दिल्यास त्यांच्या जीवनाची दशा होणार नाही. तरुणाई भरकटण्या पासून सावरण्यासाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करावा.” श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे कथाकार ,प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी विचार मांडले.
प्राथमिक ,माध्यमिक आश्रमशाळा सांगवी(ता.फलटण) येथे युवा छायाचित्रकार हर्षल लोखंडे यांचा वाढदिवस शालेय साहित्य , ग्रंथ, फळे , वृक्षरोपण करुन साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमास अंकुश शिंदे सर,दत्तात्रय काळे,गणेश गवळी,मारुती शिर्के गुरुजी,युवराज खलाटे, शिवमुर्ती लोखंडे,पोपट शिंदे गुरुजी,पार्थ तावरे,कल्पना लोखंडे ,मित्र परिवार,आश्रम शाळेतील शिक्षक ,कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“केक कापून व बिभत्स उत्साही स्वरुपाने वाढदिवस साजरा न करता गरजू , अनाथ , वंचित मुलांच्या सहवासात फल छेदन करुन साजरा करणे. काळाची गरज आहे.” असे प्रा. रवींद्र कोकरे यांनी सांगितले .या आगळ्या वेगळ्या चळवळीचे कौतुक सगळीकडे होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश शिंदे सर यांनी केले. स्वागत माध्यमिक आश्रशाळेचे मुख्याध्यापक गणपत नाळे , सूत्रसंचलन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग येवले, तर आभार प्रदर्शन सेवा गडकरी सरांनी केले.