*
फलटण टुडे दि. ३० :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना कमिन्स स्काॅलरशिप बाबत माहिती देण्यासाठी कमिन्स कंपनीचे जितेंद्र कुमार व सोफिया जमादार उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कमिन्स स्काॅलरशिप बाबतची पात्रता, ऑनलाईन फाॅर्म कसा भरावा, निवड पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली.
कमिन्स कंपनी सी. एस. आर. फंडांतर्गत दरवर्षी सुमारे २०० विद्यार्थ्यांना कमिन्स स्काॅलरशिप प्रदान करते. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक फी, परिक्षा फी, स्टेशनरी खर्च देण्यात येतो, तसेच लॅपटॉप व विद्यार्थ्यांना कमिन्सच्या अधिकारी वर्गाकडून मेंटरशीप सुद्धा दिली जाते.
अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथील पात्र विद्यार्थी दरवर्षी या स्काॅलरशिप साठी अर्ज करतात व येथील विद्यार्थ्यांची निवड ही मोठ्या प्रमाणावर होते असे प्रतिपादन यावेळी जितेंद्र कुमार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सोफिया जमादार या अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथील मेकॅनिकल विभागाच्या माजी विद्यार्थीनी असून महाविद्यालयाचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या स्काॅलरशिप साठी अर्ज करावेत असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी केले आहे.
—————————–