कु. रुजल नचिकेत जोशी
फलटण टुडे वृत्तसेवा :
कोलंबो, श्रीलंका येथे दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडलेल्या 8 ते 12 वयोगटातील एशियन युथ गेम्स 2023 योगा स्पर्धेमध्ये कुमारी रुजल नचिकेत जोशी वय वर्ष ९ हिने जागतिक स्तरावर सिल्वर मेडल मिळवले आहे. त्याबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सध्या रुजल ही ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल निगडी येथे शिकत असून या स्कूलमधील अभिश्री रजपूत यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. फलटण येथील सौ.वंदना जोशी व श्री. नंदकुमार जोशी यांची ती नात आहे.