सैनिक बोधवांना राखी बांधतान विद्यार्थीनी आमदार दीपक चव्हाण व इतर सैनिक बांधक
सैनिक बोधवांना राखी बांधतान एन सी सी च्या कॅडेट व इतर मान्यवर
सैनिक बांधवांना राखी बांधलताना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राचार्य बी एम गंगावणे व इतर मान्यवर
फलटण टुडे, (फलटण) दि. 31 : –
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून दि. 29 ऑगस्ट रोजी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. दीपक चव्हाण हे उपस्थित होते यावेळी अनेक माजी सैनिक तसेच कर्तव्यावर रुजू असलेले पण सध्या सुट्टी निमित्त गावी आलेले सैनिक बांधव यांना विद्यालयाने पत्राद्वारे निमंत्रण देऊन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास 25 आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर आधारित असते. या सैनिकांच्या देश निष्ठे मुळेच देशातील प्रत्येक नागरिक हा मुक्तपणे श्वास घेत असतो. सैनिकांच्या या देश प्रेमासाठी एक कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात बोलावून त्यांचे औक्षण करून राखी हातावर बांधणे व सिमेवरील सैनिक बांधवांना सणानिमित्त राख्या पाठवणे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं यासारखा स्तुतत्य उपक्रम आपल्या विद्यालया मध्ये आयोजित करण्यात आला. असे मोनोगत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले .
यावेळी विद्यालयातील विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन आमदार मा. दीपक चव्हाण व लष्करातील मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना गौरवण्यात आले .
यावेळी प्रमुख उपस्थिती सुभेदार मेजर बांदल , शंकर बांदल ,सुभेदार मेजर दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे ,सुभेदार यशवंत मारुती बांदल ,सर्जेराव निकम , धनाजी झणझणे , दिगंबर पवार , प्रमोद जगताप ,शंकर बोबडे , तानाजी साळूंखे , पर्यवेक्षीका सौ मनिषा बगाडे , पर्यवेक्षक गोपाळराव जाधव , ज्ञानेश्वर गायकवाड , डी जी पवार , यावेळी प्रमुख उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे , ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य मा. ज्ञानेश्वर देशमुख , माध्यमिक चे उपप्राचार्य मा. आण्णासाहेब ननवरे व पर्यवेक्षक मा. वसंत शिंदे यांनी गुलाबपुष्प देऊन केले .
इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी ‘ या उपक्रमांचा एक भाग म्हणून विद्यालया मधील विद्यार्थ्यांनी “एक राखी सैनिकांसाठी ” या उपक्रमांतर्गत राखी प्रशिक्षण कार्यशाळा व सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामुळे सैनिक बांधव भारावून गेले व त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा.अरविंद निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेसाठी मुधोजी हायस्कूल चे कला व सांस्कृतिक विभागाचे शिक्षक बापूराव सूर्यवंशी, चेतन बोबडे, सौ. तृप्ती शिंदे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप पवार यांनी केले तर प्रास्ताविक सौ तृप्ती शिंदे यांनी केले , स्वागत गीत सौ वनीता लोणकर व इयत्ता सातवी च्या विद्यार्थिनींनी गायले. तर आभार अमोल सपाटे यांनी मानले.