‘डीड्स फॉर नीड्स’ च्या वतीने सावंतवाडी ला १५ स्वयंचलित सौर ऊर्जेच्या पोल चे लोकार्पण.
फलटण टुडे(बारामती )
प्रत्येकाने जीवनात आपल्या इच्छेप्रमाणे व ऐपत प्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपल्यास व पर्यावरण पूरक कार्य केल्यास वृद्धपनी आत्मिक समाधान मिळेल असे प्रतिपादन शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलावहिनी पवार यांनी केले गोजुबावी येथे सोलार स्ट्रीट लाईट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शरयू फाऊंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या वेळी त्या बोलत होत्या.
डीड्स फॉर नीड्स’ ह्या संस्थेच्या वतीने सावंतवाडी गावाला १५ स्वयंचलित सौर ऊर्जेचे पोल देण्यात आले (रविवार २७ ऑगस्ट)
हे पोल बस स्थानक सावंतवाडी ते सभामंडप इथपर्यंत बसवण्यात आले आहेत. एरवी अंधारात असणारा रस्ता ह्या सोलर दिव्यांमुळे उजळून निघाला. रात्री शतपावली, पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडणार्या लोकांना याचा मोठा फायदा झाला. तसेच गावातील महिला, लहान मुले, वयोवृद्ध रात्री-अपरात्री सुरक्षितपणे गावच्या रस्तावर चालू लागले…
डीड्स फॉर नीड्स च्या संचालिका सौ. प्रिया कपाडिया, बारामती शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, मा. सभापती करण खलाटे, मा उपसभापती शारदा खराडे, बारामती जैन संघटनेचे अध्यक्ष सम्यक छाजेड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल कावळे, बारामती शहर सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, सूरज काटे, सरपंच प्रतिक्षा भोसले, ग्रा. सदस्य सौ. माधुरी सावंत, मा. चेअरमन विक्रम सावंत, कैलास सावंत मा. उपसरपंच शरद सावंत, पोलिस पाटील नितिन गटकळ, शरयू फाऊंडेशन, दुर्गभ्रमंती सोशल फाऊंडेशन चे सर्व सदस्य व आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
“डीड्स फॉर नीड्स” ह्या संस्थेच्या माध्यमातून वृक्षवाटप, दंत तपासणी शिबीर, ब्लँकेट वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अश्या विविध उपक्रमातून सामाजिक व पर्यावरण पूरक केल्याने आदर्शवत व प्रेरणादायी तरुण पिढी बनण्यासाठी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितले.
संस्थेच्या संचालिका प्रिया कापाडिया यांनी राज्यातील संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली प्रास्ताविक कैलास सावंत, आभार विक्रम सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन विजय सावंत यांनी केले.