महिला बचत गटाच्या वतीने वृक्षारोपण

वृषरोपण करताना बचत गटाच्या महिला

फलटण टुडे(बारामती )  
रक्षा बंधन निमित्त हनुमान नगर येथील महिला बचत गटाच्या वतीने सवित्रीबन पणदरे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी हनुमान नगर बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सातव ,
पणदरे ग्रामविकास मंचचे पदाधिकारी,सचिन कुंभार, राजेश साळुंखे, गणेश जगताप, संतोष शेलार,राजेश कोकरे , हर्षदा सातव माधवी शेडगे, सुप्रिया सुर्यवंशी,सारीका रणदिवे, वैशाली गायकवाड,वर्षा पाचांगणे ,शुभांगी तावरे आदी सदस्या व मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळाचे सावट तीव्र होत असताना वृषरोपण च्या माध्यमातून पर्यावरण रक्षण झाले पाहिजे म्हणून वेगळा उपक्रम म्हणून रक्षा बंधन निमित्त वृषरोपण केल्याचे हनुमान नगर बचत गटाच्या वतीने सांगण्यात आले.
पणदरे ग्रामविकास मंच तरुणांनी एकत्र येऊन फाॅरेस्ट मध्ये वनराई फुलवली आहे.देशी झाडे लावली जातात.आणि ती जगवली ही जातात. एक शेततळे बनवून झाडे पशु पक्षी प्राण्यांची पाण्याची सोय केली आहे .पाऊस न पडल्याने..सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना सावित्रीबनात झाडे जगली असल्याचे संजय कोकरे यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!