हेरंब लोणकर यांचे एसटी साठी म्हतपूर्ण योगदान: सचिन सातव

अपंग असून सुद्धा परिस्थिती वर मात करून सेवानिवृत्ती 

अपंग कर्मचारी हेरंब लोणकर यांचा सपत्नीक सत्कार करताना सचिन सातव व इतर मान्यवर

फलटण टुडे (बारामती )
एसटी कर्मचारी प्रवाश्यांना उत्कृष्ट सेवा देत असताना रात्रंदिवस काम करतो परंतु त्याला अत्यल्प वेतन मिळते ही खेदजनक बाब असून येणाऱ्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला सुगीचे दिवस यावेत अशी अपेक्षा बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी केले.
एसटी महामंडळाच्या बारामती विभागीय कार्यशाळा येथील गुणवंत कर्मचारी हेरंब कमलाकर लोणकर यांचा सेवानिवृत्ती बदल सत्कार व गुणवंत कर्मचारी पुरस्कार सोहळा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सचिन सातव बोलत होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव,मा.नगरसेवक सुरज सातव, यंत्र अभियंता महेश वाघमोडे, वाहतूक अधीक्षक घन:श्याम शिंदे,कसबा प्रबोधिनीचे अध्यक्ष राजू देशपांडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष महेश सावंत, पोपटराव ढवाण ,अरविंद सातव सुनील जाधव,अविनाश रणसिंग एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले व काशीविश्वर तरुण मंडळ कसबा येथील पदाधिकारी व एसटी अधिकारी कर्मचारी यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
अपंग कर्मचारी असताना सुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास च्या बळावर विविध क्षेत्रात यश मिळवले ,कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण केल्या, व एसटी चे प्रवासी वाढावेत म्हणून कार्य केले.
 उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण एसटी ची सेवा केल्याने हेरंब लोणकर गुणवंत झाल्याचे मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले 
प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले तर आभार सोमनाथ गायकवाड यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!