दालवडी येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा.शिवाजीराव घोरपडे , मा .नितीन शेठ गांधी , बाबासाहेब गंगवणे इत्यादी मान्यवर

फलटण टुडे ( फलटण ): –
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी यांच्या आयोजनात दालवडी येथे सोमवार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ झाला

 यावेळी अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा.शिवाजीराव घोरपडे (गजेंद्रगडकर ) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी च्या स्कूल कमिटी चे चेअरमन मा.नितीन शेठ गांधी यांच्या शुभहस्ते पार पडला . यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री शेडगे सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले .

यावेळी मा . श्री शिवाजीराव घोरपडे म्हणाले की कठोर मेहनत व परिश्रम केल्यास यश नेहमीच आपल्याला मिळत असते शालेय जीवनात आपणास खेळाची सवय लागल्यास निश्चितच आपल्याला योग्य दिशा मिळते .तसेच दैनंदिन सरावामुळे आरोग्य उत्तम व शरीर तंदुरुस्त राहते असे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले .

आज झालेल्या 14 , 17 , 19 वर्षांखालील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील मुले 16 संघ 17 वर्षाखालील मुले 16 संघ 19 वर्षाखालील मुले 8 संघांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये चिठ्ठ्या टाकून लॉट्स पाडण्यात आले . यावेळी हे काम संतोष जाधव , उत्तमराव घोरपडे ,स्वप्निल पाटील , यांनी पाहिले यावेळी संघ व्यवस्थापकांचे स्वागत शांती काका सराफ यांच्या सौजन्याने आयोजकां मार्फत गुलाबपुष्प ,टोपी व शिट्टी देऊन करण्यात आले व विद्यालयाच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना श्रीनाथ रोकडेश्वर दूध संकलन केंद्र दालवडी यांचे सौजन्याने स्पोर्ट किट देण्यात आले

यावेळी प्रमुख उपस्थिती अधीक्षक फ ए सो मा श्रीकांत फडतरे ,फ ए सो गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा सी डी पाटील , दालवडीचे सरपंच मा मधुकरराव शिंदे , मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य मा बाबासाहेब गंगवणे,फलटण तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ सोनवलकर , क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल पाटील , पंकज पवार , उत्तमराव घोरपडे , सचिन धुमाळ , डी एन जाधव ,तुषार मोहिते , अमोल नाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

 तसेच यावेळी संघ व्यवस्थापक म्हणून संतोष जाधव , वाघमारे सर , आहिवळे सर , काकडे सर , कर्णे सर , पुजारी सर , शिंदे सर , क्षिरसागर धनश्री , सौ .सस्ते , सौ गेजगे , संदीप ढेंबरे , सूळ सर , कोलवडकर सर , तरटे सर , सौ.गावडे मॅडम , सौ मोहिते मॅडम गावातील क्रीडा प्रेमी नागरिक माजी विद्यार्थी , पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी तर प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शेडगे सर यांनी केले व आभार निंबाळकर सर यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!