फलटण टुडे(बारामती प्रतिनिधी ) :
सुर्यनगरी मधील योद्धा स्पोर्टस् अकॅडमी व ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन च्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आले होते यांचे उदघाटन शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी योद्धा स्पोर्टस् क्लब चे मार्गदर्शक अक्षय थोरात, स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मास्टर साहेबराव ओहोळ व उत्पादन शुल्क अधिकारी महेश लेंडे, दादा आनंदकर ,सुभाष भोसले
महेश चौधर, आदी मान्यवर उपस्तीत होते
पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून टाडिंग,तुंगल, गंडा, रेगो,व सोलो, इत्यादी पाच प्रकारात खेळला जातो. या खेळाला युवकल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया, इत्यादीची मान्यता असून हा खेळ केंद्रीय नोकर भरतीच्या पाच टक्के आरक्षणात आहे. गेल्या १२ वर्षापासून योद्धा स्पोर्ट्स क्लब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन बारामती च्या माध्यमातून खेळाडू व रेफरी (पंच)घडविण्याचे कार्य बारामती मध्ये करत असल्याचे मास्टर साहेबराव ओहोळ यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या खेळाच्या माध्यमातून पदक मिळवून आई वडील, प्रशिक्षक व देशाचे नाव उज्जवल करावे असे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.
आभार अक्षय थोरात यांनी मानले.