फलटण टुडे (बारामती ):
विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे दि. 22 ऑगस्ट रोजी ग्रामीण उद्योज जागरूकता विकास योजनेअंतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान – काळाची गरज या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ. अशोक पी. गिरी (प्राचार्य शास्त्रज्ञ, एनसीएल पुणे) , डॉ. अतुल कुमार मिश्रा (रिसर्च असोसिएट, व्हीएसआय पुणे) आणि श्री दीपक सरोदे (वरिष्ठ संशोधन सहकारी, व्हीएसआय पुणे) तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ यांनी मांडले.
डॉ.अशोक पी. गिरी यांनी विद्यार्थ्यांना चांगले संशोधक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाचे बारकाईने निरीक्षण विषयी देत
त्य संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेले झाडे ओळखावी फुले, जन ओळखावे बोले. संशोधनाच्या मूलभूत गरजा, त्या विषयी माहिती गोळा करणे, प्रकल्पाची परिकल्पना, चर्चा करण्याची क्षमता, रेकॉर्ड ठेवणे, परिणाम काहीही असो तो स्वीकारा या विषयी माहिती दिली. कृषी जैवतंत्रज्ञानातील संशोधनाने सामाजिक समस्या कशा सोडवता येतील याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. अतुलकुमार मिश्रा यांनी वनस्पती ऊती संवर्धनात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे या विषयी सविस्तर माहिती दिली. दीपक सरोदे यांनी वनस्पती ऊती संवर्धनाचे महत्व, आणि त्यामुळे रोग विरहित व चांगल्या प्रतीच्या रोपांचा पुरवठा मोठया प्रमाणावर कसा करू शकतो या विषयी विचार सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. रोहिणी कोळेकर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सीमा पाटील करून दिला, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. शैलजा हरगुडे यांनी मानले.