फलटण टुडे (फलटण) : –
फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्यूनिअर काॅलेज , फलटण या ठिकाणी सुखकर्ता नाॅन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन (N.G.O.) अंतर्गत” पर्यावरण वाचवा अभियान ” या अभियानाअंतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणुन फिरस्ते गाई व इतर जनावरे आपण टाक लेले प्लास्टिक मधील खाद्य पदार्थामुळे विनाकारण निष्पाप जनावरे बळी ठरतात हे याच्या सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी व त्यांचात या उपक्रमाद्वारे जागृती करण्यात आली .
यावेळी विद्यालयाच्या वतीने ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य मा. ज्ञानदेव देशमुख यांनी सुखकर्ता नाॅन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन (N.G.O.) चे मा.शाम पवार व त्यांच्या सहकार्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सामाजिकतेचा जाणीव म्हणुन स्वयंस्फुर्तीने या उपक्रमासाठी निधी जमा करून दिला.या दरम्यान मा.उपप्राचार्य देशमुख व सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद यांच्या हस्ते हा निधी सुखकर्ता नाॅन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन (N.G.O.) चे मा.शाम पवार व त्यांच्या सहकार्यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास प्रा.सुधाकर वाकुडकर, प्रा. निलीमा कुमठेकर , प्रा. धनश्री निंबाळकर, प्रा. वनिता लोणकर , प्रा. कविता जगताप , प्रा.एम बी.बेस्के , प्रा. सुरज खलाटे, प्रा.दिपक निंबाळकर, प्रा. प्रविण जाधव, प्रा.अनिकेत गायकवाड,
विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रितम लोंढे यांनी केले तर आभार प्रा. संदिप पवार यांनी केले