फलटण टुडे (बारामती ) :
ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांच्या वस्तूचे प्रदर्शन व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा चे आयोजन बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आले.
याचे उदघाटन अल्ट्रामॅन अवधूत शिंदे,आयर्नलेडी वैष्णवी ननवरे, स्केटिंग खेळाडू निशांत दोरगे, नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सुश्मिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले सांगता समारंभ वेळी मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे ,
मराठा सेवा संघाचे प्रदीप शिंदे, देवेंद्र शिर्के, संभाजी माने, व राहुल जगताप, प्रशांत दोडमिसे, प्रवीण मोरे आणि जिजाऊ सेवा संघ बारामती च्या अध्यक्षा सौ. हेमलता परकाळे ,
सौ.स्वाती ढवाण उपाध्यक्षा ,सौ. सुनंदा जगताप कार्याध्यक्षा,सौ प्रतिभा बर्गे, सहकार्याध्यक्षा,सौ. ज्योती खलाटे सचिव,सौ सारिका परकाळे – सहसचिव -सौ संगीता शिरोळे – खजिनदार सौ अर्चना परकाळे – सह खजिनदार,सौ प्रियांका नलवडे सदस्या,सौ कल्पना माने सदस्या
सौ मनिषा शिंदे सदस्या,सौ. विद्या निंबाळकर सदस्या,सौ. सारिका मोरे सदस्या,सौ ऋतुजा नलवडे – सदस्या
आदी मान्यवर उपस्तीत होते
घरगुती खानावळ चालवून मुलांना उच्च शिक्षित करणाऱ्या दुर्गा खानावळ च्या संचालिका विमल जाधव यांचा खास ‘कर्तुत्वान उद्योजक महिला’ म्हणून सन्मान करण्यात आला त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रायोजक महिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
रजनीदेवी दोडमिसे व त्रिम्बकराव दोडमिसे यांच्या लग्नाच्या ५० वाढदिवसानिमित्त इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांनी कु राधिका बबन डेरे हिला सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रदर्शन व पुरस्कार च्या माध्यमातून महिलांचे आर्थिक धाडस वाढावे व आर्थिक सक्षम होणे साठी पुढे यावे म्हणून सदर उपक्रम राबवित असल्याचे जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे यांनी सांगितले.