फलटण टुडे (बारामतीप्रतिनिधी )
तालुक्यातील डोर्लेवाडी येथील
घोडेवस्ती केंद्र येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृषरोपण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सहेली फाऊंडेशन अध्यक्षा रोहिणी खरसे यांच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सदर उपक्रम राबिण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष, काशिनाथ घोरपडे, शाळा मुख्यध्यापक अनिल निकम, अंबादास नरुटे आदी मान्यवर उपस्तीत होते आदी मान्यवर,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ची सांगता करत असताना सामाजिक बांधिलकी जपत सदर उपक्रम राबवित असल्याचे सहेली फाऊंडेशन अध्यक्षा रोहिणी खरसे यांनी सांगितले.