फलटण टुडे (बारामती ):
बारामती शहरातील टी सी कॉलेज ते क्रिएटिव्ह अकॅडमी येथील रस्त्याचे डांबरीकरण होणे बाबत श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान व स्थानिक नागरिक यांनी नगरपरिषद प्रशासन कडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार गुरुवार दि १७ ऑगस्ट रोजी सदर रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले .
या पूर्वी सदर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना ये जा करताना प्रचंड अडचण होत होती त्याच प्रमाणे रस्त्यावर वाहने चालविणे सुद्धा कठीण होऊन गेले होते व पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साठवून अपघात होत होते त्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते त्यामुळे स्थानिक नागरिक व श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान चे विकास देशपांडे, शिवाजी सावंत, मुकुंद तारू, ऍड रमेश कोकरे, विकास फरतडे, बाळासाहेब खराडे ,प्रा राजेंद्र अटपळकर, आनंद कापडणीस, आदित्य भातलवंडे, सुधाकर गेजगे, स्वप्निल जिरंगे, अक्षय रणसिंग, सुरज तांबे, सौ साधना सोपानराव पाचपुते व इतर स्थानिक नागरिकांनी रस्ता होणे साठी सातत्याने नगरपरिषद प्रशासन कडे पाठपुरावा केला होता.
नगरपरिषद प्रशासनाने त्वरित सदर रस्त्याचा विषय मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.