जिजाऊ भवन च्या वतीने “बाप समजून घेताना ” व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद
फलटण टुडे (बारामतीप्रतिनिधी ) :
ज्या प्रमाणे आई चे योगदान महत्वाचे आहे त्याच प्रमाणे वडिलांचे योगदान सुद्धा म्हतपूर्ण आहे परंतु ते व्यक्त होत नाहीत ,मुलांना उत्तम शिक्षण मिळावे व जीवनात सर्व काही मिळावे म्हणून नेहमी कष्ट करणाऱ्या बापाला एखादे दुष्कृत्य करून खाली मान खालून जीवंतपनी जाळू नका असा सल्ला व्याख्याते वसंत हुंकारे यांनी दिला.
बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने सामाजिक प्रबोधन म्हणून ‘ बाप समजून घेताना ‘ या व्याख्यानाचे आयोजन रविवार २० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
या प्रसंगी बारामती सहकारी बँकचे चेअरमन सचिन सातव व जिजाऊ भवन चे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी , पालक, विध्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांना
आबासाहेब अर्थातच त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज कळाले, त्यांचा संघर्ष कळला अनेक आमिषे असताना सुद्धा मृत्यू स्वीकारला परंतु त्यांनी मिळवलेले स्वराज्य शत्रूला दिले नाही इतिहासा पासून ते आता पर्यंत ज्यांना बाप कळाला ,त्याचा आदर केला ते जिंकले परंतु खोट्या प्रेमाला, प्रलोभणाला,खोट्या सोशल मीडिया मधील ओळखीला बळी पडून ऐन तारुण्यातील पिढी ‘चुका ‘ करून बसतात व त्याचे प्रायश्चित सर्वात जास्त समाज्यात व इतर ठिकाणी बाप नावाच्या व्यक्तीला दिले जाते, मानहानी होते आशा वेळी त्यांनी तुमच्या साठी केलेले कष्ट आठवा.
कदाचित
शिक्षणात ,नोकरीत यश मिळाले नाही तरी चालेल आयुष्यभर पोसण्याची जवाबदारी वडील घेऊ शकतात परंतु त्यांची मान खाली जाईल असे कृत्य करू नका क्षणिक प्रलोभनाला बळी पडू नका, शैक्षणिक पात्रता व आर्थिक क्षमता निर्माण करा,
एकमेकांच्या कुटूंबातील संमतीने लग्न करा.
विविध क्षेत्रातील उदाहरणे देत, अभिनय,विनोद करीत, बाप म्हणजे काय हे सांगताना अनेक महिला, मुली, उपस्तीत हे भावनाविवश होऊन अश्रू अनावर झाले.
व्याख्यान झाल्यावर अनेक, विद्यार्थी, पालक यांनी असे व्याख्याने होणे गरजेचे असून समाधान व्यक्त करून आयोजन केल्याबद्दल
बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांचे आभार मानले
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.