ज्ञानसागर च्या विद्यार्थ्यांचे दक्षिण कोरियात यश

दक्षिण कोरियात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेत 15 वाढीव गुण

दक्षिण कोरिया मध्ये ज्ञानसागर गुरुकुल चे सहभागी झालेले विद्यार्थी

फलटण टुडे (बारामती ):
तालुक्यातील सावळ येथील 
ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरिया मध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी-2023 मध्ये सहभाग घेतला .
  दि. 1ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2023 या दरम्यान दक्षिण कोरिया या देशात 25 वी आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी-2023 पार पडली. या आंतरराष्ट्रीय जांबोरीचे उद्घाटन दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सीओक योल याच्या शुभहस्ते संपन्न झाले.यात जपान, अमेरिका, भारत,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, ,चीन, जर्मनी, फ्रान्स, इटली, तैवान, स्वीडन, स्वित्झर्लंड, नागालॅंड असे एकुण 58 देशातील 48 हजार स्काऊट आणि गाईड सहभागी झाले होते. या जांबोरीत सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, परेड रॅली,शारीरिक कसरत प्रात्यक्षिके, कुकींग असे अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते भारत देशाचे सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातून बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेतील सात विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते. या आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीत सहभागी विद्यार्थी भावना रावत, आदित्य चव्हाण, दिव्या आटोळे, संस्कार रायते,स्वयम कुंभार, प्रणव भरणे ,अर्थव खताळ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे .
स्काऊट मास्टर प्रा. सागर आटोळे व सर्व विद्यार्थ्यांचे संपुर्ण महाराष्ट्राने कौतुक केले. 
आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी ही स्पर्धा दर पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्काऊट कमिशनर मधुसुदन सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आशा आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून फक्त ज्ञानसागर गुरुकुलमधील या सात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल संपुर्ण देशामध्ये या शाळेचे , विद्यार्थ्यांचे व संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर मानसिंग आटोळे व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांचे कौतुक करण्यात येत आहे.

चौकट: 
दक्षिण कोरिया मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना
 महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने इ.10 वी व इ.12 वी च्या बोर्ड परिक्षेत 15 गुण वाढीव गुण म्हणून दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा सागर आटोळे यांनी सांगितले




———
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!