शिलाफलक अनावरण ,स्वातंत्र्य व माजी सैनिकाचा सन्मान

बारामती नगरपरिषद च्या वतीने ‘माझी माती ,माझा देश ‘अभियान संपन्न 

पहिल्या छायाचित्रात शिलाफलक अनावरण व दुसऱ्या छायाचित्रात स्वातंत्र्य व माजी सैनिकांचा सन्मान करताना मान्यवर

(छायाचित्र: मल्लिकार्जुन हिरेमठ)
फलटण टुडे (बारामती ): 
स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘माझी माती, माझा देश’ ‘मातीस प्रणाम वीरांना वंदन’ हे अभियान बारामती नगर परिषदेच्या वतीने संपन्न करण्यात आले.
या निमित्ताने शारदा प्रागण येथे शीलाफलक अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले व ध्वजारोहण ,राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत आणि पंचप्रण शपथ देण्यात आली या 
त्यानंतर नगरपरिषद च्या सभागृहात बारामती तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक व आजी माजी सैनिक त्यांच्या कुटुंबीयांचा प्रमानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मा. नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, कमल कोकरे, आशा माने, नीलिमा मलगुंडे,वनिता बनकर, संतोष जगताप, सूरज सातव व मुख्याधिकारी महेश रोकडे आणि जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत नींबाळकर, स्वातंत्र्यसैनिक संघटना अध्यक्ष निलेश कोठारी, व नगरपरिषद अधिकारी ,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
नगरपरिषद च्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या उत्तरधिकारी आणि आजी माजी सैनिक,वीर पत्नी, वीर माता यांचा सन्मान झाल्याने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्याचे समाधान होत असल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांनी नगरपरिषद प्रशासन यांचे कौतुक केले.
देशासाठी बलिदान व योगदान देणाऱ्या चा सन्मान करणे ही भारतीय संस्कृती असून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.
त्याग, बलिदान, योगदान ची परंपरा पुढील पिढीला सुद्धा माहीत होणे गरजेचे आहे स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांचा सन्मान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता निमित्त करण्याचे भाग्य नगरपरिषद ला मिळाले त्यामुळे या पुढेही मोठ्या जोमाने कार्य करू असेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगून उपस्तीत यांना पंचप्रण शपथ दिली.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले व आभार संतोष तोडकर यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!