श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेन्टर चा अनोखा उपक्रम
फलटण टुंड (बारामती ):
अनेक जोडप्यांना अपत्य नसल्याने जीवनात नैराश्य आलेले असते आशा वेळी योग्य उपचार व अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवाच्या जोरावर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर च्या उपचार प्रणाली नुसार अपत्य सुख मिळते व त्या जोडप्याच्या जीवनात आनंद प्राप्ती होते त्यामुळे वंध्यत्व निवारण ही काळजी गरज असल्याचे प्रतिपादन डॉ आशिष जळक यांनी केले.
१५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर बारामती व सांगोला सेंटर च्या नोंदणी केलेल्या जोडप्यांचा लकी ड्रॉ काढून त्यातील भाग्यवान ठरलेल्या ७५ जोडप्यांना स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करत असताना मोफत आय. वी.एफ. उपचार मिळणार आहेत लकी ड्रॉ च्या कार्यक्रमात डॉ आशिष जळक उपस्तीत जोडपे, नातेवाईक यांना मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र चे माजी वरिष्ठ प्रबंधक काशिनाथ जळक, सुमन जळक, डॉ प्रियांका जळक, डॉ दत्तात्रय पाटील, डॉ अनुराधा अनमुले, डॉ. सुहासिनी सोनवले व रोहन भोसले आणि सांगोला ब बारामती सेन्टर चे रुग्ण, त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
मोठ्या शहरात महागडी उपचार पद्धती असल्याने ग्रामीण भागातील रुग्णाची गैरसोय होत असते आशा प्रसंगी माफक दरात म्हणजेच ६५ हजारात उपचार व ३५ हजारात मेडिकल खर्च असे एकूण फक्त १ लाखात आय. वि. एफ.उपचार देण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी म्हणून श्री चैतन्य मातृत्व योजना २०२२-२३ योजने अंतर्गत
फक्त लकी ड्रॉ मधील ७५ रुग्णांना मोफत सेवा देणार असल्याचे डॉ आशिष जळक यांनी सांगितले.
अनेक वर्षे अपत्ये नसल्याने अनेक ठिकाणी उपचार घेतले ,भरपूर पैसा खर्च झाला, वेळ वाया गेला परंतु डॉ आशिष जळक यांच्या अचूक उपचार व मार्गदर्शन मुळे अपत्य प्राप्ती झाल्याने आनंदी व समाधानी जीवन प्राप्त झाल्याचे अनेक जोडप्यानी मनोगत मध्ये सांगितले.
बारामती सेन्टर चे ६५ व सांगोला सेन्टर चे १० असे ७५ जोडप्यांचा नंबर लकी ड्रॉ पद्धतीने मान्यवर व रुग्णाच्या हस्ते काढण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार राहुल तुपे यांनी मानले.