फलटण टुडे(बारामती ):
स्वतंत्रदिन १५ ऑगस्ट निमित्त
कटफळ येथे ग्रामपंचायत कटफळ यांच्या वतीने १२ वर्षे वयोगटावरील स्पर्धकांसाठी ५ कि.मी व १२ वर्षे आतील स्पर्धकांसाठी १ कि मी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. व विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये ५ कि मी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. विकास पोळ यांनी मिळविला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण बारामती शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष जय पाटील व बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ अनिल बागल यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी सरपंच विजय कांबळे , उपसरपंच संध्याराणी झगडे ,सदस्य डाॅ संजय मोकाशी ,संग्रामसिंह मोकाशी ,तात्याराम रांधवण ,पुनम कांबळे,सीमा मदने ,संध्या मोरे ,ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे ,व विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
———