सापडलेले मोबाईल अखेर कामगारांना परत

मूळ मालक असणाऱ्या कामगारांना मोबाईल देताना इरफान इनामदार भाऊसाहेब उदमले

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती एमआयडीसी येथील उद्योजक इरफान इनामदार व त्यांचे मित्र भाऊसाहेब उदमले यांना रेल्वे लाईन लगत४ मोबाईल सापडले होते ओळख पटवून त्यांनी त्या चार कामगारांना मोबाईल परत दिले.
रेल्वे लाईन लगत सकाळी चालण्याचा व्यायाम करीत असताना मोबाईल मधील अलार्म वाजला परंतु चुकून कोणाचा तरी पडला असेल म्हणून दुर्लक्ष करून इनामदार व उदमले पुढे गेले परत येत असताना त्याच जागेवर वारंवार अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आल्यावर पिशवीत विविध कंपन्यांचे ,विविध मॉडेल चे चार मोबाईल होते त्यामध्ये सिम कार्ड नव्हते म्हणून बारामती एमआयडीसी मधील उद्योजक यांच्या व्हाट्सउप ग्रुप वर सदर मोबाईल सापडल्याचे व फोटो टाकले .
व्हाट्सउप च्या माध्यमातून चौधरी मॉल येथे काम करणारे सुरेंद्र मामबोलिया, धर्मेंद्र पिप्लोडिया, सुनील बामनिया, मोहन सिंग या चार कामगार यांनी संपर्क साधून, मोबाईल लॉक कोड व मोबाईल मधील फोटो व इतर ओळख सांगितली व सदर मोबाईल चोरीला गेलेले सांगितले होते.
चोरट्यानी मोबाईल लॉक न उघडल्याने फक्त सिम कार्ड काढून मोबाईल फेकून दिले असावेत असे कामगारांनी सांगितले.
आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कामगारांचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी इरफान इमानदार व भाऊसाहेब उदमले यांना धन्यवाद दिले 
उद्योजक व त्यांच्या मित्राच्या चाणाक्ष पणा मुळे त्वरित मूळ मालकास मोबाईल मिळाले या बदल दोघांचे सुद्धा कौतुक होत आहे .
फोटो ओळ: 
मूळ मालक असणाऱ्या कामगारांना मोबाईल देताना इरफान इनामदार व सापडलेले मोबाईल अखेर कामगारांना परत 
बारामती: 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!