फलटण टुडे (बारामती ):
आकांक्षा जितेंद्र मिश्रा यांना अमेरिकन राष्ट्रपती यांचा’ उकृष्ट शैक्षणिक पुरस्कार ‘ मिळाला आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक नोंदी, रोबोट बनविण्याच्या स्पर्धा मध्ये सहभाग, अभ्यासा व्यक्तिरिक्त इतर,खेळ सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची उत्कृष्ट नोंदी व सहभाग, इयत्ता ७ मध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा उत्तम बौद्धिक क्षमता असल्याने इयत्ता ८ वी मधील गणित विषयाचा अभ्यास सुद्धा करण्याची क्षमता आदी सर्व बाबीची दखल घेऊन अमेरिका सरकारच्या शिक्षण विभागाने
कु.आकांक्षा जितेंद्र मिश्रा हिस राष्ट्रपती शिक्षण पुरस्कार अंतर्गत राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या कार्यालयाच्या वतीने ‘उकृष्ट शैक्षणिक पुरस्कार ‘ जाहीर करून राष्ट्रपतीचे मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.
आकांक्षा मिश्रा यांचे वडील जितेंद्र मिश्रा हे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये कार्यरत असून अमेरिका येथील मॅपल व्हॅली येथे कुटूंबियां सहित राहतात तर आकांक्षा सुमित ट्रेल मिडल स्कुल मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहे.
बारामती एमआयडीसी मधील
जी टी एन कंपनीचे महाव्यवस्थापक उद्धव मिश्रा यांची आकांक्षा नात असून अमेरिका येथे बालवयात शैक्षणिक पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत त्यांच्या यशाबद्दल बारामती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने मिश्रा परिवाराचे अभिनंदन करण्यात आले.