स्पर्धेतील खेळाडूंची ओळख करुन शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , नितीन ताराळकर , शिवाजीराव घोरपडे सुजीत पाटील , महादेवराव माने व इत्यादी मान्यवर
फलटण टुडे (फलटण):
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कॉलेज , फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ,तसेच नितीन ताराळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे ,मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगवणे बी.एम, नूतन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी सुजित पाटील , विनोद खुडे, नितीन भोंसले, महादेवराव माने, क्रीडा मागदर्शक प्रा.स्वप्निल पाटील , प्रा. तायप्पा शेंडगे तसेच मुधोजी हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ हे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या तीन वयोगटातून जवळजवळ 50 ते 60 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा माजी. आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण व मुधोजी महाविद्यालय फलटण या दोन क्रीडांगणावर दि. 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेचे सामने सकाळ सत्रात व दुपार सत्रात पार पडणार आहेत.
या स्पर्धेतील प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजेता संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी सातारा व फलटण मधील अमित काळे ,आक्रम मेटकरी , मोनिल शिंदे ,सत्यजीत मोरे ‘संकेत चव्हाण , गौरव काठाळे हे क्रीडा तज्ञ पंच म्हणून कामगिरी पाहणार आहोत.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक अमित काळे , संजय फडतरे , बी बी खूरंगे , कुमार पवार , सुहास कदम तसेच सर्व सीनियर फुटबॉल खेळाडू काम पाहत आहेत .